सोमवार, 16 जनवरी 2012

कविता

लिहि म्हंटल की कविता कशी लिहायची,
शब्दांना काना,मात्रा,वेलांटी कशी द्यायची,
प्रेम कविता लिहीण्यास स्वप्नात तरी प्रेम करावे लागते,
विनोदी कविता करयला मनात हास्य अणावे लागते,
विरह गीत लिहीण्या साठी विरह जगायलाच पाहिजे,
मनात असलेल्या क्षणाला सार्थक शब्दच आला पाहिजे,
प्रयत्नांतरी विडंबन काही सगळ्यांना जमत नाही,
विडंबन करायला तर रेष ही कगदावर उमटत नाही,
कविता करायला मनात तसे भाव जगावे लागतात,
आणि तेव्हा कुठे शब्द -म्हणी कवितेत गुंफतात