शनिवार, 11 फ़रवरी 2012

मागचे 3-4 दिवस मी "अरुणा ढेरे"ह्यांचे पुस्तक वाचते आहे अर्ध्यावाटेवर त्यातिल काहि वाक्य मझ्या मनात रुजली त्यांना मी कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.बघा आवडतो का?

शब्दांचा अलिकडे थांबणॆ आता शक्य नाही
पण तडफडून शब्दा जवळ जाता  ही येत नाही,
शब्द कधी खूप ताठर, कधी माऊ पणाने भरलेले
पुष्कळ यातना शब्दा मध्ये घर करुन बसलेले
क्षणा मागे दूर लांबवर शब्दांचा वास असतो
आणि आलेले सगळे क्षण आपण शब्दांत भरतो
स्वतःला आपण अज्ञात तरी आपल्या कडे पहातो
ते मर्मस्पर्शी अनुभव ,झगडण,कोसळ्णे शब्दांत भरतो
स्वतः मधले अभाव,अधिक पाझरण ही दूःख असते
सगळ्याची सांगड घालून लिहणारे शब्द म्हण्जे छळ असते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें